॥ पाटणादेवीची आरती ॥
पाटणके चंडिके तुझा रहिवास डोंगरी हो।
नाना परीच्या वल्ह्या शोभा देती निरंतरी हो।
जाई जुई शेवंती प्रिती मोठी पुष्पावरी हो।
दिवट्यांचे गोंधळ आपण खेळे नानापरी हो।
आदिनाथ योगिनी चंडिका पाटण के स्वामिनी हो।
पर्वतावलोकनी भक्ता अभयवर देऊनी हो॥१॥
पितांबर नेसली पद्मासनी बैसली हो।
अंगची काचोळी केशर बुक्क्यांनी भाळली हो।
वैजयंती हार कंठी मोतीयाची जाळी हो।
नाकचे चौपान चरणी घागरीया जिल्हारी हो॥२॥
चिरेबंदी मंदिर दुरुनी दिसतसे शिखर हो।
धरनाईक बैसले ॠषी ब्राह्मण थोर थोर हो।
तीर्थाचा महिमा धवल तीर्थ उदक स्थिर हो।
ब्रह्यार्पण सोडती भक्त करिती जयजयकार हो॥३॥
य़त्रकोटी जन्म झाला तैसा अवतार धरीला हो।
भक्तांचा वंश तिने पुर्ण उध्दरीला हो।
उत्तम तिचा देह विष्णू लोका प्रती गेला हो
भ्क्तांकित अभिमानी विष्णु दासाची माउली हॊ ॥४॥
ई-मेल: contact@patnadevi.com
</div>
</div>