मुख्यपृष

पाटणादेवी हे ठिकाण महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील चाळिसगाव पासुन नैऋत्येस १८.०० कि.मी. अंतरावर असलेले जागृत आदिशक्ति चंडिकादेवीचे पुरातन मन्दिर आहे. हे मन्दिर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी
ऊंच चौथार्‍यावर धवल तिर्थापासुन उगम पावलेल्या डोगरी नदीच्या किनारी आहे.जवळ्च असलेल्या पाटणा य़ा लहान गावाचे नावामुळे हे ठिकाण पाटणादेवी या नावाने ओळखले जाते. मंदिराजवळचा परिसर अतिशय नयनरम्य
आणि मनमोहक अशा निसर्गसौंदर्याने बहरलेला आहे.तिन्हीबाजुने अर्धचन्द्राकार सह्याद्रि पर्वताचे ऊंचकडॆ, विविध वृक्ष, वनस्पति डोंगरातुन खळखळ वाह्णणारे ओढे यामुळे मन मोहुन जाते. विशेषत: पावसळ्यात
औगस्ट सप्टेंबरमधे येथील वातावरण मनला प्रसन्नता देणारे, शांत व अल्हाददायक असते. ह्या दिवसात मन्दिरच्या चौथार्‍यावरुन मन्दिराचे भोवतलचा परिसर म्हणजे वनराइने नटलेले पर्वताचे ऊंच कडे, रंगिबेरंगी
फ़ुला – फ़ळानी बहरलेले वृक्ष, सापासारखे नागमोडी खळ्खळ वाहनारे ओढे, हे सर्व दृष्य पाहताना मन सर्व गृहस्थी जिवन विसरुन निसर्गाशी
एकरुप झल्याशीवाय राहात नाही. अशा या रमणीय़ ठिकणाचा पुर्व ईतिहास तितकाच ऎतिहासिक महत्वाचा आहे.

आज मंदिरात असलेली मुर्ती खुपच भव्य आहे. तितिकीच प्रसन्न्मुख आहे. भक्तांनी एकदा दर्शन घेवुन त्यांचे समाधान होत्त नाही तर त्यांना पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावेसे वाटते. भक्तांना मंदिरातुन निघावेसे
वाट्त नाही कही तर भगवतीचा प्रसन्न व हसतमुख चेहरा पाहुन आपले भानच विसरुन जातात. अनेक हिन्दु जाती-जमातीची ही कुलस्वामीनी आहे. आजही कुलधर्म कुलाचारात बरेच भक्त धवलतिर्थातुन भगवतीचे स्मरण करुन पुजेसाठी
तांदळा नेतात दरवर्षी भगवतीचे शारदीय नवरात्र महोत्सव व वासंतिक यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात भक्तांचे हर्ष उत्साहात साजरे होतात दर पोर्णिमेस भगवतीची महापूजा क्रण्यात येते. भक्तांच्या मुलभूत गरजा पुरविण्याच्या
दॄष्टीने पाटणा निवासिनी चंडिकादेवी प्रतिष्ठाण या न्यासाची नोंदणी करण्यात आली आहे. आपल्या उद्देशपुर्तीसाठी प्रतिष्ठाण प्रयत्न शील असते. दर पोर्णिमेस प्रतिष्ठाणांमार्फत महाप्रसाद वितरण माध्यान्य कालीन पूजेनंतर केला जातो.
आज हे मंदिर भारतीय पूरातन विभागाचे निग्राणित आहे. येणा-या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी वनखात्यामार्फत काही खोल्या मुक्कामासाठी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. तसेच नवस व इतर कार्यक्रमासाठी एक धर्मशाळा उपलब्ध करुन दिलेली आहे हे स्थान प्रत्येक भगवती उपासकाने पाहण्यासारखॆ आहे.
ई-मेल: contact@patnadevi.com