॥ क्षमा प्रार्थना ॥
कोट्यावधी अपराध पतित मी शरण आलो तुला।
आई गे सांभाळूनी घे मला चंडीके सांभाळूनी घे मला ॥१॥
तुझी पुजा मी जाणत नाही कैसे करु गे यला।
सांभाळुनी घे मला चंडीके सांभाळुनी घे मला॥२॥
मंत्र तंत्र हे तंत्रही नाही माहित नाही गे मला।
सांभाळूनी घे मला चंडीके सांभाळूनी घे मला॥३॥
गायन पण हे येतही नाही आळवु कैसे तुला।
सांभाळूनी घे मला चंडीके सांभाळूनी घे मला॥४॥
हरि विनवितो तुझीया चरणी करुणा येऊ दे तुला।
सांभाळूनी घे मला चंडीके सांभाळूनी घे मला॥५॥
कोट्यावधी अपराध पतित मी शरण आलो तुला।
आई गे सांभाळूनी घे मला चंडीके सांभाळूनी घे मला॥६॥