॥ आरती ॥
येई ओ देवी माझे माउली ये ।
येई ओ देवी माझे माउली ये ।
दोन्ही कर जोडुनी, दोन्ही कर जोडुनी ।
तुमची वाट मी पाहे ! तुमची वाट मी पाहे ।
येई ओ देवी माझे माउली ये ॥ धृ ॥
पिवळी साडी ही अंबे, लाल साडी ही अंबे।
कैसी गगनी झळ्कली, कैसी गगनी झळकली।
सिंहावर बैसुनी माझी चंडिका आली,
व्याघ्रावर बैसुनी माझी चंडिका आली।
येई ओ देवी माझे माउली ये ॥ १ ॥
आलीया गेलीया अंबे, आलीया गेलीया अंबे।
अंबे धाडी निरोप अंबे धाडी निरोप
पाटण्यामध्ये आहे चंडिका माय।
पाटण्यामध्ये आहे चंडिका माय।
येई ओ देवी माझे माउली ये ॥ २ ॥
चंडिके चे राज्य, चंडिकेचे राज्य।
आंम्हा नित्य दिपावली। आम्हां नित्य दिपावली ।
चंडिका देवीला अहंभावे ओवाळी।
चंडिका देवीला सॊहंभावे ओवाळी।
येई ओ देवी माझे माऊली ये ॥ ३ ॥