शॄंगार चावडी

शॄंगार चावडी
ही एक हिंदु धर्मीय लेणी असून प्रथम अभ्यास करणार्या बोर्जेस यांनी तिचा काळ ११ व्या शतकातील ठरविला आहे. लेण्यास दोन भाग असून एक व्हरांडा व दुसरी आतील खोली. आतील मंडप ९ फुट रुंद व ७फुट लांब आहे. त्यात कोणतेच शिल्प नाही. दरवाजा ८फुट उंच त्याला तिन द्वारशाखा आहेत. द्वारशाखेच्या खालच्या बाजूस उभ्या असलेल्या स्त्रीचे शिल्प आहे. लेण्याचा दुसरा भाग म्हणजे व्हरांडा हा ७ फुट रुंद १० फुट लांब असा आहे. यामध्ये कही शृंगारीक शिल्पे कोरलेली आहेत.