धवलतीर्थ
पाटणादेवी मंदिराजवळुन १ कि.मी. अंतरावर पायवाटेने गेल्यावर धवलतीर्थ हा धबधबा आहे. पावसाळ्यात उंचावरुन पडत असलेल्या पाण्याचे दृश्य खुपच मनमोहक असते. ह्याच ठिकाणी देवीचे आद्दउपासक गोविंदस्वामी यांना देवीचा साक्षात्कार झाला. देवीच्या पौराणीक कथेप्रमाणे देवी ह्याच ठिकाणी अदॄश्य झाली म्हणुनच आजही कुळाचारात अनेक भक्त पूजेसाठी येथे येवून देवीचे स्मरण करुन देवीचा तांदळा येथुनच घेवुन जातात.