॥ भगवतीची स्तुती प्रार्थना ॥

॥ भगवतीची स्तुती प्रार्थना ॥

जय जय विश्वपते हिमांचल सुते सत्यं व्रते भगवते|
वांच्छा कल्पवॄते कृपा नमवृते भक्तांकिते छद्‌मते|
साधु वत्सलते अधर्म रहिते स्वधर्म ते पालिके|
साष्टांगे करितो प्रणाम चरणी जय जय महा चंडीके ॥१॥

अष्टादंड भुजा प्रचंड सहा विक्राळ दाढा शुळा।
रक्त श्री बुबुळा प्रताप आगळा ब्रह्मांड माळा गळा।
जिव्हे उग्र स्थळा रुळे लळ लळा विक्राळ कालांतके|
साष्टांगे करीतो प्रणाम चरणी जय जय महा चंडीके॥२॥

समरी चापकरी फिरे गरगरा चक्रापरी उद्भवे।
आरोळी फुटता धरा थरथरा कापे उरी तटतटा।
साक्षातकाळ दुरी पळे झरझरा धाके तुझ्या अंबिके।
साष्टांगे करितो प्रणाम चरणी जय जय महा चंडीके॥३॥

कोटीच्या शतकोटी बाण सुटती संग्राम प्राणापरी।
तेवी रुप प्रचंड भ्रमरी मार्तंड तारांगणी ।
सोडावा तव सुप्रताप पाहता गर्वात श्री त्र्यंबके ।
साष्टांगे करितो प्रणाम चरणी जय जय महा चंडीके ॥४॥

अंगी संचरताच कोप उठती ज्वालामुखी भडभडा।
धरणी आदळती द्विपाद उठती शेंडे-मुळे तटतटा।
चामुंडे वर रक्त घोट घटघटा म्हैश्यासुर प्राशके ।
साष्टांगे करितो प्रणाम चरणी जय जय महा चंडीके ॥५॥

निजमुक्त पद दे भवानी वर दे चरणी तुझ्या राहु दे ।
स्वधर्म मति दे प्रपंची सुख दे विघ्ने दुरी जाऊ दे ।
धैर्यश्री बल दे सुकिर्ति यश दे बाधू नको पातकें।
साष्टांगे करितो प्रणाम चरणी जय जय महा चंडीके ॥६॥

आशापाश नको जगी भीक नको परद्रव्य दारा नको।
काया क्लेश नको दया त्यजु नको निर्वाण पाहु नको।
कामक्रोध नको दया रिपु नको निंदा नको या मुखे ।
साष्टांगे करितो प्रणाम चरणी जय जय महा चंडीके ॥७॥

अनाथा छळणे कृपा विसरणे आशेसी आगेची हा ।
तुझा तुच पहा विचार करुनी अन्याय की न्याय हा।
विष्णू दास म्हणे कॄपाची करणे आता जगन्नाईके।
साष्टांगे करितो प्रणाम चरणी जय जय महा चंडीके ॥८॥

बरी हो बरी बाण घेऊनी गेली।
प्रचंडा सुरा दैत्य मरदोनी आली।
तदी पासूनी पर्वती रहिवास केला।
जंणा कारणे थोर आनंद झाला।
उदयॊसुतु उदयॊसुतु उदयॊसुतु
हरि ॐ तत्सद्

ई-मेल: contact@patnadevi.com