महादेव मंदिर

महादेव मंदिर हे मंदिर चाळीसगाव-पाटणादेवी रस्त्यावर पाटणादेवी पासून सुमारे १.५ कि. मी. अंतरावर आहे. ६/७ फुट उंच चौथ‍र्‍यावर पुर्वेभिमुख मंदिर आहे. नेहमीप्रमाणे गर्भगृह सभामंडप आणि व‍र्‍हांडा अशी याची बांधणी आहे. महाराष्टातील मोठ्या मंदिरात याची गणणा होते. गर्भगृह चंद्राकृती असून आतून गोलाकार २८ कोपर्‍यांचा आहे. मदिर ७५ फुट लांब , ३६ फुट रुंद व १८ फुट उंच आहे. गर्भगृहाचा दरवाजा सुंदर नक्षीकामाचा आहे. वर गणेश पट्टी असून या गणेश पट्टीवर शिव गणेशासहित सप्तमात्रुका कोरल्या आहेत. गर्भगृह व सभामंडपामध्ये असलेल्या जागेत एक दगडी शिलालेख कोरलेला आहे.
ई-मेल: contact@patnadevi.com