नागार्जून कोठी

नागार्जून कोठी

या लेण्याचा आकार प्रमाणबध्द नसुन व्हरांडा १८ फुट लांब, ६ फुट रुंद आहे. यास काही चौकोनी तर काही खांब षटकोनी आहेत.लेण्यासमोर एक खांब असुन त्यास सतीचा खांब अशी संज्ञा आहे. मूल होण्यासाठी चंडिकादेवीचे दर्शन घेउन नागार्जुन येथील सतीच्या खांबाजवळ नवस बोलला जातो व इच्छा पूर्तीनंतर त्या नवसाची सांगता देवीजवळ केली जाते. या खांबाची उंची सहा फूट आहे. आतील सभामंडप २० फूट * १८ फूट आहे. मध्यभागी दोन नक्षीकाम केलेले सुशोभित खांब आहेत. खांबाच्या दर्शनी भागावर अंबा व इंद्र यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.सभागृहाच्या आतील समोरील भिंतीला लागून कमळावर ध्यानस्थ बसलेल्या महावीरांची मूर्ती आहे. दोन्ही बाजुस दोन दिगंबर तीर्थकारांच्या मुर्त्या आहेत. वरच्या बाजूस दोन चौरी धारी सेवक आहेत. मकर व छत्र कोरलेले आहे. याच सभागृहाच्या पुर्वेकडील भिंतीवर एक ६ फुट उभी मुर्ती आहे हिच मुर्ती नवसाला पावते असा लोकांचा विश्वास आहे.